मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून शिवाजी पार्कात परप्रांतियाचा महिलेवर हल्ला
प.बंगालच्या तरुणाने महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई : मराठी बोलण्याचा आग्रह केला म्हणून प.बंगालच्या तरुणाने महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात हा प्रकार समोर आला आहे. महिलेने पश्चिम बंगालच्या तरुणाला मराठीत बोल असे सांगितले पण रागाच्या भरात या तरुणाने महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा लगावला. पश्चिम बंगालचा हा तरुण कुरियर बॉय आहे. आधी त्याने त्या महिलेच्या चेहऱ्यावर गुद्दा मारला. एवढ्यावरच तो तरुणा थांबला नाही तर त्यानंतर त्याने पेनाने महिलेवर वार केले. इब्राहीम शेख असे या तरूणाचे नाव असून तो दादरच्या पालांडे कुरीयर मध्ये काम करतो. त्याच्याकडे किंग सर्कलच आधाक कार्ड सापडलं आहे. गेल्या २० वर्षापासून मुंबईत राहत असल्याच त्याने पोलिसांना सांगितलं आहे. पुस्तकांची डिलीव्हरी द्यायला घरी गेला असता महिलेने मराठी बोलण्यास सांगितले. आणि त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली.
महिलेने आधी हात उगारल्याच तरूणाने पोलिसांना सांगीतले. महिलेला मारहाण करणाऱ्या इब्राहिम शेख विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केली आहे. त्याच्याविरुद्ध ३२३(मारहाण करणे), ३२४(धारधार शस्त्राने मारहाण करणे) ३५४( विनयभंग), ५०६(धमकावणे), ५०९ ( शिवीगाळ/महिलेच्या मनात लज्ज उत्पन्न करणे) या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादर सारख्या मध्यवर्ती भागात हा गंभीर प्रकार समोर आला आहे. आता मराठीसाठी लढणारे राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण महाराष्ट्रात मराठी बोलण्यास सांगितल्याने असे प्रकार घडत असतील तर ते अतिशय निंदनीय असून यावर कडक कारवाईची मागणी होत आहे.