मुंबई : Sanjay Raut On Ram Navami and Hanuman Jayanti : आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवरती कधी तणावाचे वातावरण नव्हते, कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते. पण यावेळेला देशातल्या काही शक्तीनी ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचले आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत  यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील वातावरण तणावग्रस्त करण्याचे षडयंत्र देखील रचले होते. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला आहे. काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरुन स्पष्ट झाले आहे. या विषयावरती सरकारसोबत चर्चा होऊ शकत होती. सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आहेत, त्याच्या वरती काही कार्यवाही सुरु आहे, असं असताना फक्त या राज्यांमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करुन भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट निर्माण करणारी स्थिती निर्माण करणे, यासाठी हे भोंग्याचे राजकारण झालं होतं, पण काल कोल्हापूरचं झालेलं मतदान आणि लोकांनी ठेवलेला संयम यामुळे हे वातावरण बदललं आहे, असे राऊत म्हणाले.


यावेळी राऊत यांनी महागाईवरुन केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. लंका आहे तिथे जा, जरा अभ्यास करा. आपल्या शेजारच्या राष्ट्रात काय चाललं आहे ते पाहा. श्रीलंकेत याआधी सोन्याच्या विटा होत्या, आता त्या ठिकाणी महागाई आणि बेरोजगारी हे दोन प्रश्न आहेत आणि आता या देशात देखील असेच प्रश्न निर्माण झाले आहेत.  त्यामुळे भाजप स्वतःला दूर ठेवण्यासाठी नव्याने प्रश्न निर्माण करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 


दरम्यान, बिगर भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री एकत्र येत आहेत, विशेष करुन ममता या सर्वांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री यांनी एकत्र करुन मुंबई संदर्भात एक कॉन्फरन्स घेणार आहोत, त्यासंदर्भात तयारी सुरु झालेली आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.  


यावेळी संजय राऊत किरीट सोमय्या यांना टोला लगावला. त्यांनी कुणालाही पत्र लिहून द्या, ते विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत.  एक आरोपी जेव्हा पत्र लिहितो  त्यांनी पत्र पाठवत राहावं.  बाबासाहेब पुरंदरे हे त्यांच्यावतीने बाजू मांडण्यासाठी जीवित नाहीत, त्यामुळे अशा व्यक्ती ज्या जीवित नाही त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही.