मुंबई : एमएमआरडीएने मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे. या कामाला विरोध करणाऱ्या रहिवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली. कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दम्यान, याप्रकरणी भातखळकर यांनीही  ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मला अटक करण्यात आल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Atul Bhatkhalkar Arrested By Mumbai Police Aarey Police Station)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज शनिवारी सकाळी कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी याला विरोध केला. त्याचवेळी भातखळकर यांनी तिथे धाव घेत विरोध केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भातखळकर यांनीही ट्विट करत माहिती दिली. 


अतुल भातखळकर यांनीच ट्विट करताना म्हटले आहे, ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना मारहाण केली. या विरोधात आवाज उठवल्याने मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत.



मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले; त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उद्ध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.


कुरार मेट्रो स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील सुमारे 150 रहिवाशांना मुंबई पालिकेने घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर या घरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.