मुंबई : Auto Rickshaw Taxi fare in Mumbai :मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी (Taxi fare) आणि रिक्षातून प्रवास ( Auto Rickshaw) करणे आता महागला आहे.  शनिवार दि. 1 ऑक्टोबरपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार आता भाडे द्यावे लागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीचे किमान भाडे अनुक्रमे 23 आणि 28 रुपये करण्यास मुंबई महानगर प्राधिकरणा (एमएमआरटीए)ने अखेर मंजुरी दिली आहे. ही नवी भाडेवाढ 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे. (Auto Rickshaw and Taxi fare in Mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑटो रिक्षासाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्या 1.5 किमीसाठी ही पैसे असणार असून त्यापुढे प्रत्येक किमीसाठी 14.20 रुपये, टॅक्सीसाठी याच अंतरासाठी 25 रुपयांऐवजी 28 रुपये आणि पुढे प्रत्येक किमीसाठी 15.33 रुपये, कूल कॅबसाठी 33 ऐवजी 40 रुपये आणि पुढे प्रत्येक किमीसाठी 22.26 रुपये मोजावे लागतील.


मुंबईत रिक्षा 2 रुपये तर टॅक्सीची 3 रुपये भाडेवाढीची मागणी करण्यात  आली होती. रिक्षाचं भाडे 21 वरुन 23 रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. तर टॅक्सीचे भाडे 25 रुपये होते. आता ते 28 रुपये होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्याप्रमाणे ही नवी भाडेवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलसह सीएनजी महागल्याने ही भाडेवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.


मुंबईतील ऑटो रिक्षाचे भाडे लवकरच वाढू शकते, असा इशारा रिक्षा युनियनने दिला होता. इंधनाच्या दरात झालेल्या वाढीनंतर हा इशारा देण्यात आला होता.  सीएनजीच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे, आमच्या परिचालन खर्चात प्रति किमी 1. 31 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये असून पहिल्या 1.5 किमीनंतर सध्या 14.20 रुपये प्रति किमी भाडे आहे. आता या भाड्यात वाढ झाली आहे.