रिक्षाचालकाकडून तरुणीला मारहाण आणि विनयभंग
घाटकोपरमधील धक्कादायक प्रकार
मुंबई : रिक्षा चालकाने तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये घडला आहे. मेरू युनूस खान असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. घाटकोपरमधील जागृती नगर येथे हा प्रकार घडला आहे. तरुणीकडून पैसे लुटून तिला मारहाण देखील करण्यात आली आहे. तरुणीचा एक दात देखील या मारहाणीत तुटला आहे. पोलिसांनी घाटकोपरमधून या रिक्षाचालकाला अटक केली आहे.