काम चुकारांवर `प्रहार` करणाऱ्या हातातून पाझरतेय `आभाळमाया`
हा माणूस काही अधिकाऱ्यांमध्ये कठोर मनाचा माणूस म्हणून ओळखला जातो, पण आज त्यांचा मायेझा पाझरही सर्वांनी पाहिला.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातील अपक्ष आमदार बच्चू कडू सर्वांनाच माहित आहेत. ज्यावेळी सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नाहीत, आणि त्यांना सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, अशा कामचुकार अधिकाऱ्यांचा बच्चू कडू यांच्याकडून समाचार घेतला जातो.
बच्चू माझा लेकुरवाळा
काही काम चुकारांवर प्रहार करणाऱ्या, बच्चू कडू यांच्या हातातून 'आभाळमाया' या लहानग्यांवर ओसंडून वाहत आहे. बच्चू कडू यांनी दिवाळी निमित्ताने एका अनाथालयात जाऊन, या मुलांना अंघोळ घातली.
अपना भिडू बच्चू कडू
बच्चू कडू यांनी लहानग्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत दिलासा दिला, म्हणून सर्वसामान्यांनी बच्चू कडू यांना दिलेलं ब्रीद वाक्य, 'अपना भिडू बच्चू कडू' सार्थकी लागल्याचं हे चित्र आहे. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. शेतकरी आणि पीडितांना न्याय देण्यासाठी बच्चू कडू यांची प्रहार संघटना कार्य करत असते.