मुंबई : राज्य सरकारची कर्जमाफी योजना पूर्णपणे फसली असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. बँकांच्या तक्रारी निवारणाकरता आमदार कडू यांनी अमरावतीमध्ये आज जनता दरबाराचे आयोजन केलं होतं. या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी आमदार बच्चू कडू यांच्यासमोर कथन केल्या. सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करून आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र अजूनही हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. 


काही शेतकऱ्यांनी आपल्या जवळचे पैसे भरून कर्ज रिक्त केल्याचा दाखला घेऊन ठेवला आहे. मात्र या शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नसल्याचं प्रकरण समोर येत आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात १ लाख ९७ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफी करिता ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यापैकी ७६ हजार शेतकरी अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत.