मुंबई : रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेकांना अटक केली होती. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चेंट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले. 26 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला. आर्यन आणि अरबाज पाठोपाठ रेव्ह पार्टी प्रकरणातील इतर सातही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. संबंधित सात जणांना सेशन कोर्टकडून जामीन मंजूर झाला आहे.



गोपालजी आनंद, समीर सहगल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, नुपूर सतीजा, गोमित चोप्रा आणि अचित कुमारलाही यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान जामीन मंजूर झाल्यानंतर अर्यन खान जेलमधून बाहेर पडला आहे. तर अरबाजला संध्याकाळी सोडणार असल्याची माहिती अस्लम मर्चंट यांनी दिली आहे. आर्यन आणि अरबाजला जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.