`माझं कुटूंब माझी जबाबदारी म्हणता, मग या मुलांची जबाबदारी सरकारची नाही का?`
माझं कुटूंब माझी जबाबदारी म्हणतात, मग या मुलांची जबाबदारी सरकारची नाही का? असं ट्ववीट
मुंबई : माझं कुटूंब माझी जबाबदारी म्हणतात, मग या मुलांची जबाबदारी सरकारची नाही का? असं ट्ववीट मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निषेधार्थ आज जोरदार आंदोलन केलं. यानंतर सर्वच विरोधकांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्ववीट करत सरकारवर टीका केली आहे.
माझं कुटूंब माझी जबाबदारी म्हणता ना, मग या मुलांची जबाबदारी सरकारची नाही का? नियमात भेदभाव का? असा सवाल बाळा नांदगांवकर यांनी केला आहे. येथे नाईट क्लब, निवडणुका सर्व नियम मोडून सर्रास चालतात. मग सामान्य जनतेलाच सर्व नियम लागू आहेत का? असा सवाल ट्ववीटच्या माध्यमातून बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आक्रमक आंदोलन केलं आहे. एमपीएससी परीक्षेची तारीख १४ मार्च २०२१ रोजी ठरलेली होती, पण ती कोरोनाच्या कारणाने पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा मागील वर्षभरात ४ वेळेस पुढे ढकलण्यात आली आहे. यावरुन पुण्यातील शास्त्री रस्त्यावर आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं आहे.
विद्यार्थ्यांनी बराच वेळ रस्ता अडवून ठेवला, एवढंच नाही ठिय्याही दिला. यावेळी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
पुण्यात अवघ्या महाराष्ट्रातून एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मुलं येतात, या दरम्यान विद्यार्थी काटकसर करीत राहण्याखाण्याचा खर्च करत असतात, शहरातील विविध लायब्ररींमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात, क्लासेस करतात.
एमपीएससी पास करुन अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगतात, त्या दिशेने स्ट्रेटिजी आखत अभ्यास करतात, पण सरकारने वेळोवेळी एमपीएससी परीक्षांच्या तारखेत बदल केल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत.