मुंबई :  Rajya Sabha by-election : काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना आज भाजपचे नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, राज्यसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. यावेळी कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेणार, असल्याचे फडणवीस यांनी माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  भाजपने  या निवडणुकीसाठी उमेदवार दिला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आज  देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली.


बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या विनंतीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे  फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान, रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपाला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटले होते की, आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील.