Bmc Election : राज्यानंतर आता लक्ष्य महापालिका, भाजप-शिंदे एकत्र लढणार?
शिवसेनेला (Shiv Sena) राज्य सरकारमधून पायऊतार केल्यानंतर आता महापालिकेतूनही हद्दपार करण्याचा मानस हा भाजपचा (Bjp) आहे.
मुंबई : राज्यात सत्तानाट्यानंतर (Maharashtra Poltics) सर्वच राजकीय समीकरणं बदलली. राज्यात एकाबाजूला महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aaghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही दिवसांवर मुंबई महापालिका (Bmc Election 2023) येऊन ठेपली आहे. शिवसेनेला (Shiv Sena) राज्य सरकारमधून पायऊतार केल्यानंतर आता महापालिकेतूनही हद्दपार करण्याचा मानस हा भाजप-शिंदे गटाचा (Bjp) आहे. (balasahebanchi shiv sena and bjp may contest in upcoming bmc election 2022 maharashtra politics)
मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिंदे गटानं कंबर कसलीय. मुख्यमंत्री शिंदेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत मुंबईतल्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत मुंबईतील सर्व खासदार आणि आमदार उपस्थित होते. मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणनीतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. थोडक्यात सांगायचं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गट एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळतायेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथिगृहात मुंबईतील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवली गेली. त्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष येणारी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार यांचे स्पष्टं संकेत मिळत आहेत. मात्र याबाबत अजून तरी अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.