Balloon Blast in Car: आपल्या लाडक्या मुलाच्या बर्थ डे पार्टीसाठी (Birthday Party) त्यांनी जोरदार तयारी केली. बर्थ डे पार्टीसाठी हॉल बूक केला, सुपरहिरोची (Super Hero) थीमही ठरवण्यात आली. डेकोरेशनसाठी फुगे (Balloon) आणले, पण हे फुगेच कुटुंबाच्या आनंदावर विरजन टाकणारे ठरले. कारमध्ये ठेवलेल्या फुग्यांचा स्फोट झाल्याने बर्थ डे बॉयसह तीन जण जखमी झाले. स्फोटामुळे कारलाही आग लागली. मुंबईतल्या अंधेरी भागात ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?
आपल्या चार वर्षांच्या मुलाच्या बर्थ डेसाठी एका कुटुंबाने अंधेरीत एक हॉल बूक केला. हॉलच्या डेकोरेशनसाठी त्या कुटुंबाने डीएन नगरमधील एका विक्रेत्याकडे 80 फुग्यांची ऑर्डर दिली. हॉलवर बर्थ डेचं जोरदार सेलिब्रेशन झालं. पार्टी संपल्यानंतरते कुटुंब आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघालं, मुलाच्या हट्टाखातर काही फुगे त्यांनी आपल्या कारमध्ये ठेवले. पण इमारतीच्या गेटवर पोहोचताच गाडीतील फुग्यांचा स्फोट होण्यास सुरुवात झाली. स्फोटामुळे गाडीलाही आग लागली आणि यात मागच्या सीटवर बसेलला चार वर्षांचा मुलगा भाजला. 


फुग्यांचा स्फोट का झाला?
फुग्यांच्या स्फोटाचं कारण स्पष्ट झालं आहे. फुग्यांमध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हेलिअम गॅसऐवजी ज्वलनशील असणारा हायड्रोज वायू ((Hydrogen in Birthday Party Balloon)भरण्यात आला होता. याबाबत फूके विक्रेत्याने कुटुंबाला कोणतीही चेतावणी दिली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. 


तीन जणांवर उपचार 
दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. चार वर्षांच्या मुलाचा चेहरा, कान आणि उजवा हात भाजला आहे. या घटनेत मुलगा इतका घाबरला आहे की थोडसा आवाज झाला तरी तो घाबरतो असं त्याच्या आईने सांगितलं.