मुंबई : गेली अनेक वर्ष रखडलेला वांद्रे इथल्या शासकीय निवासी वसाहतींच्या पुर्नबांधणीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीनं दोन टप्प्यात या वसाहतीचा पुर्नविकास केला जाणाराय. पहिल्या टप्प्यात रिकामी झालेल्या इमारतींच्या जागी 14 मजल्यांचे 5 टॉवर बांधले जाणार आहेत. यामुळं सुमारे 2 हजार 250 पेक्षा जास्त घरं उपलब्ध होतील. ही घरं प्रत्येकी 30 चौरस मीटर म्हणजे सुमारे 333 चौरस फुटांची असतील. प्रत्येक घरासाठी पार्किंगची जागाही सोडली जाणार आहे.

दोन टप्प्यात काम 


हे बांधकाम येत्या पावसाळ्यानंतर सुरु होणार असून सुमारे 18 महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण केला जाणाराय तर दुस-या टप्प्यात आणखी 4 हजार घरांचं बांधकाम केलं जाणाराय.