मुंबई :  तुमची महत्त्वाची बँकेची कामं पेंडिग असतील तर तुम्हाला ती २५ तारखेच्या आधी करावी लागणार आहेत. कारण राज्यातील बँका सलग ३ दिवस बंद(Bank Closed for Three Days)  राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व कामं गुरुवारपर्यंतच उरकून घेणे आवश्यक आहे. (Bank) तीन दिवसांनंतर एटीएममध्ये (Bank ATM)  पैशांचा तुटवडा जाणवेल. यामुळे आताच रोख रक्कम काढून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आठवड्यात सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नववर्ष साजरं करण्यासाठी कुठे बाहेरगावी जात असाल किंवा तुम्हाला रोखीच व्यवहार करायचे असतील तर ते गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावे लागणार आहेत. २५ डिसेंबरला नाताळची सुट्टी आणि २६,२७  डिसेंबर चौथा शनिवार रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात सलग तीन दिवस बॅंकांना सुट्टी असणार आहे. तसंच नवं वर्ष सुरु होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांमध्येही काही बदल होणार आहेत. त्यामुळे बॅकेशी संबंधित व्यवहार वेळेत पूर्ण करावे लागणार आहेत.


याव्यतिरिक्त, देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका सलग ९ दिवस बंद राहणार आहे. ही माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. शिलाँग आणि मिझोरमची राजधानी ऐझॉलमध्ये २४ डिसेंबर २०२० रोजी ख्रिसमस इव्हच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहे. त्यानंतर २५ डिसेंबरला ख्रिसमस आणि २६ डिसेंबरला शिलाँग प्रांतात बँक बंद राहणार. २७ डिसेंबर रोजी रविवारची सुट्टी असेल. 



तसेच यू किआंग नंगबाहमुळे ३० डिसेंबर रोजी शिलाँग राज्यातील बँका बंद राहणार आहे. ३१ डिसेंबर रोजी न्यू इअर नाईटमुळे ऐझॉलमध्ये बँक बंद राहणार आहे.