मुंबई : पुढील महिन्यापासून दसरा-दिवाळी सण सुरु होणार आहेत. त्यामुळे बँकांना या महिन्यांत अधिक सुट्ट्या असणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने बँक बंद राहील. ऑक्टोबरमधील ही पहिली सुट्टी असणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबर रविवार, ८ ऑक्टोबरला दसरा असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार आणि १३ आणि २० ऑक्टोबरला रविवार असल्याने बँक बंद राहणार आहे.


दिवळीमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार आणि २७ ला रविवार आहे. दिवाळीही रविवारीच आहे. २८ ऑक्टोबरला दिवाळी पाडवा असल्याने बँक बंद राहील.