मुंबई :  जून महिन्यात बँकेशी (Bank Holidays In June 2022) संबंधित कोणतेही काम करण्याचा विचारात असलेल्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जून 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. (banking holiday list in june month 2022 know how many days bank are closed see details daywise list)


आरबीयाकडून सुट्ट्यांचं 3 वर्गवारीत विभाजन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणीत विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा (Negotiable Instruments Act), रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे (Real Time Gross Settlement Holiday) आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खात्यांचा समावेश आहे. 


राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्यांमध्ये विशिष्ट सुट्ट्या आहेत.  ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. जाणून घेऊया जून महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.


जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी


2 जून (गुरुवार) :    महाराणा प्रताप जयंती/तेलंगाना स्थापना दिवस - हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणा. 
3 जून (शुक्रवार):   श्री गुरु अर्जुन देव जी की शहादत दिवस - पंजाब
5 जून (रविवार):    साप्ताहिक सुट्टी
11 जून (शनिवार):   दूसरा शनिवार
12 जून (रविवार):  साप्ताहिक सुट्टी
14 जून (मंगलवार):  पहिली राजा/संत गुरु कबीर जयंती - उडीसा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाब. 
15 जून (बुधवार):  राजा संक्रांती/वायएमए दिवस/गुरु हरगोबिंदजी जन्मदिवस - उडीसा, मिझोरम, जम्मू आणि कश्मीर. 
19 जून (रविवार):  साप्ताहिक सुट्टी
22 जून (बुधवार):  खारची पूजा - त्रिपुरा
25 जून (शनिवार):  चौथा शनिवार 
26 जून (रविवार):  साप्ताहिक सुट्टी 
30 जून (बुधवार):  रेमना नी - मिजोरम