मुंबई : टीआरपी घोटाळ्यानंतर BARCने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील १२ आठवडे टीआरपी रेटिंग जाहीर केले जाणार नाही, असे  BARCने जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान, टीआरपी घोळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीआरपी घोळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक चॅनलला उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिकच्या याचिकेवर सुनावणी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायाधीश डी वाय चंद्रचूड, इंदू मल्होत्रा, इंदिरा बॅनर्जी यांनी ही सुनावणी करण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.



 टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल'ने (BARC) टीआरपी रेटिंग सध्या करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  टीव्ही  रेटिंग जाहीर करणारी BARC ही संस्था आहे. BARC कडून प्रत्येक आठवड्याला चॅनलचे  रेटिंग जाहीर केले जातात. मात्र, पुढचे १२ आठवडे  रेटिंग जारी न करण्याचा निर्णय 'बार्क'ने घेतला आहे. 


दरम्यान, NBAने बार्कच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच, बार्कने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी एनबीएशी सल्लामसलत करावी, असा सल्लाही एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी दिला आहे.