Mumbai Local : मुंबई लोकलनं विनातिकीट प्रवास करण्याचा विचारही नकोच! `बॅटमॅन` करेल कारवाई
Mumbai Local : मुंबई लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकजण विनातिकीट लोकलचा प्रवास बिनधास्त करतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन कारवाई करणार आहे.
Mumbai Local Update in Marathi : मुंबई लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेशिस्त प्रवाशांना पकडण्यासाठी अनेकदा मोहिमा राबवल्या जातात. तर अनेक प्रवाशांचा असा समज आहे की, धावत्या लोकलमध्ये किंवा गर्दी असलेल्या लोकलमध्य तिकीट तपासनीस येत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. तर काहीजण फलाटावरील तिकीट तपासनीसांची नजर चुकवून विनातिकीट प्रवासी रेल्वे स्थानकाबाहेर पडतात. मात्र आता विनातिकीट प्रवास करणं शक्य होणार नाही. कारण पश्चिम रेल्वेने एक विशेष मोहिम राबवणार आहेत. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांनी आता सावधच व्हा, अन्यथा कारवाई केली जाईल.
पश्चिम रेल्वेने मुंबई विभागत एक टीम तयार केली असून रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला तर आता काही खैर नाही. रात्री 8 नंतर तिकीट तपासणी लोकलमध्ये किंवा रेल्वे स्थानाकांवर दिसत नाही. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट लोकलने प्रवास करतात. याचपार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 'बॅटमॅन स्क्वाड' संघ तयार करण्यात आला आहे. ही टीम रात्रीच्या वेळी लोकलमध्ये तसेच रेल्वे स्थानकांवरत प्रवाशांचे तिकीट तपासणी करणार आहेत. तसेच महिला सुरक्षितेसाठी महिला डब्यात ही त्यांची उपस्थिती असणार आहे. या टिमला 'बॅटमॅन स्क्वाड' असे नाव देण्यात आले असून हे नाव बॅटमॅन या इंग्रजी शब्दावरून घेतले आहे. याचा अर्थ 'बी अवेयर टीटीई मॉर्निंग एट नाईट' असा आहे.
आतापर्यंत सुमारे 2500 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
पश्चिम रेल्वेकडून ही मोहीम 11 मार्चच्या रात्रीपासून सुरू करण्यात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 2500 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेल्वेला सुमारे 6.50 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, बॅटमॅन टीमचे काम केवळ तिकीट तपासणे नाही तर, त्यांना रात्रीच्या वेळी स्थानकांवर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागणार आहे. बॅटमॅनमुळे या नव्या पद्धतीचा फायदा महिला प्रवाशांना होणार आहे. रात्रीच्या वेळी महिला कोचमध्ये टीटीई तपासणीमुळे एकट्या प्रवाशांना सुरक्षित वाटते म्हणून पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवासी संख्या अधिक
रात्रीच्या वेळी धावणाऱ्या एसी लोकलमध्ये तिकीट किंवा सामान्य तिकीट असलेल्या प्रवाशांची गर्दी वाढली. त्यामुळे एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांना पाचपट दराने तिकीट खरेदी करून त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावर दररोजच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर रेल्वेने रात्री बॅटमॅन पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने डिजिटल तिकिटांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेनंतर, यूटीएस मोबाइल ॲप तिकिटांचा सहभाग वाढला आहे आणि कोविडनंतर मोबाइलद्वारे बुक केलेल्या तिकिटांची संख्या दुप्पट झाली आहे.