जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका बंधाऱ्य़ांवर एक युवक अडकला होता. या युवकाला वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले, एनडीआरएफची टीम निघाली होती. पण सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी, सतत या युवकाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. पण त्यांच्या या युवकाला वाचवण्याच्या प्रयत्नांना, यश सतत हुलकावणी देत होतं. या संपूर्ण घटनेत अनेक थरार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक पत्रकार प्रवीण पवार यांनी क्षणाक्षणाचं अपडेट यात दिलं आहे. हा व्हिडीओ एक सेंकदही तुमचं लक्ष हटू देणार नाही. आतापर्यंत असं वाटत होतं. क्रिकेटमध्येच कॉमेन्ट्री असते. क्रिकेट हा तर एक खेळ आहे.


पण जीवन-मृत्यूचा खेळ किती वाईट असतो, हे येथे क्षण आणि क्षण ओरडून सांगतो. दुर्देवाने येथे जीवन आणि मृत्यूच्या खेळात कॉमेन्ट्री करण्याची वेळ या पत्रकारावर आली. कारण ही घटना प्रत्येक क्षणाला काळजाचा ठोका घेत होती. आणि अखेर...काय झालं ते तुम्हीच या व्हिडीओतच पाहा...


काय  झालं ते तुम्ही या खालील व्हिडीओतच पाहा...



या संपूर्ण घटनेचे छायाचित्रण हे दीपक सूर्यवंशी यांनी केलं आहे. तर एडिटिंग गणेश पवार यांनी केली आहे. स्थानिक 'एनएनपी बागलाण न्यूज' यांनी या घटनेचं थरार चित्रण करून जगासमोर आणला आहे. हा संपूर्ण घटनेचा थरार तुम्हाला वरील व्हिडीओत पाहायला मिळेल.