अजित मांढरे, प्रतिनिधी, मुंबई : फोनवरून तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डाची माहिती घेऊन, लाखो रूपयांचा गंडा घालण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढलेत. अशा भामट्यांना पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलेश पंडितराव यांनाही असाच एक फेक कॉल आला... पण, त्यांनी आपली फसवणूक टाळली... कसा घडला हा प्रसंग.... पाहुयात... 


ही फसवणूक नेमकी कशी होते


फेक कॉलर : आपका जो एटीएम और बँक अकाऊंट है, वो आजके दिन से बंद कर दिया है...


निलेश पंडितराव : कारण? बंद करने का कारण क्या है?


फेक कॉलर : रिझन आपका आधार कार्ड आपको मार्च में सबमिट करना था... सबमिट न होने के कारण, आपके अकाऊंट और एटीएम कार्ड को ब्लॉक किया गया है


निलेश पंडितराव : मैने बहोत पहले ही आधार कार्ड और पॅनकार्ड लिंक किया है...


फेक कॉलर : तो कब लिंक किये थे आप... नोटबंदी के पहले या नोटबंदी के बाद?


सावधान...


तुम्हालाही असाच फोन येऊ शकतो... बँकेचं एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड बंद होण्याची भीती दाखवणारा असा बोगस कॉल आला तर गडबडून जाऊ नका.. आणि आपल्या कार्डावरील माहिती कुणालाही देऊ नका... तुम्ही त्यांच्या धमकीला बळी पडलात, तर तुम्हाला हजारो रूपयांचा चुना लागलाच समजा... गोरेगावला राहणाऱ्या निलेश पंडितराव यांनाही असाच बोगस फोन कॉल आला होता. त्यांची पत्नी स्वाती यांनाही याच फेक कॉलरनं फोन करुन त्यांच्या एटीएम आणि डेबिट कार्डाची माहिती मागितली. पण निलेश आणि स्वाती पंडितराव यांनी सावधगिरी बाळगल्यानं त्यांची फसवणूक होता होता टळली...


फसवणूक टळली... 


फेक कॉलर : एटीएम कार्ड निकाले... देखिये कार्ड के उपर आपको रजिस्ट्रेशन नंबर दिया होगा कंपनी का... १६ डिजीट का नंबर होगा.. मोठे मोठे अक्षरों में १६ डिजीट का नंबर होगा, चेक किजीए...


निलेश पंडितराव : वो तो एटीएम कार्ड नंबर है


फेक कॉलर : हा... तो वो नंबर बोलिये... उसके बाद आपको एक्सपायरी डेट बोलना होगा... बस्स...


निलेश पंडितराव : अच्छा आपका नाम क्या है?


फेक कॉलर : अमित मिश्रा... चाहिए तो मेरा इमेल आयडी नोट किजीए


निलेश पंडितराव : ये इमेल आयडी है? हॅलो


फेक कॉलर : एसबीआय की वेबसाइट डालिये, सब आ जाएगा...


निलेश पंडितराव : एसबीआय का वेबसाईट है... ठीक है, मैं आपको कॉल बॅक करता हूँ...


फेक कॉलर : क्या करे ब्लॉक करे अकाऊंट को? करना है तो बोलिये... एक ही ना कस्टमर है मेरे पास... करना है तो बोलिये... दोनो लड्डू है मेरे पास... अकाऊंट बंद करने का और खाने का भी...


निलेश पंडितराव : अच्छा आप अभी फोन रख दिजीए, चलो बाय...


असा फोन कॉल तुम्हालाही आलाय का?


ज्या पद्धतीने निलेश पंडीतराव यांनी त्या फेक कॉलरला त्यांच्या एटीएम आणि क्रेडीट कार्डची माहिती न दिल्याने त्यांची फसवणूक टळली... अशाच पद्धतीने सर्वांनी काळजी घेतली तर नक्कीच त्यांचीदेखील फसवणूक होणार नाही... कारण तुम्ही सावध राहणे हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षा आहे.