मुंबई: तुम्ही आम्ही आजारी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेतो. काहींना बीपी, शुगर असल्यास नियमितपणे गोळ्या घ्याव्या लागतात. मात्र मेडिकलमधून गोळ्या घेताना सावध राहा, कारण तुम्ही घेत असलेली बरीचशी गोळ्या-औषधं नकली असू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोळ्या-औषधं हा आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. त्यातही ज्यांना बीपी, शुगर, पॅरालिसीस, संधीवात असे विकार आहेत त्यांना तर नियमितपणे गोळ्या-औषधं घ्यावी लागतात. मात्र याचाच फायदा घेत काही औषध माफियांनी नकली गोळ्या-औषधांचा काळाबाजार सुरू केला आहे. 


परराज्यातून मोठ्या प्रमाणात नकली औषधांचा साठा विक्रीसाठी आल्याची माहिती आहे. याच माहितीच्या आधारे FDAनं जळगावच्या चाळीसगावात एका रिटेल विक्रेत्याकडे धाड टाकली. तेव्हा त्यांच्या हाती बनावट औषधांचा साठा लागला. कोणत्याही बिलांशिवाय चंदीगड इथून ही औषधं आणण्यात आली असल्याचं तपासात समोर आलं आहे. 



अशाच प्रकारे बाजारात मोठ्या प्रमाणात नकली औषधं विक्रीला आल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. त्यामुळे औषधांची खरेदी, विक्री करताना ती औषधं योग्य मार्गानं आलीयेत की नाही याची खातरजमा करणं आवश्यक आहे. तसच औषधांबद्दल शंका असल्यास तात्काळ FDA  कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय. आहे


बाजारातील सगळी औषधं बनावट नाहीत. मात्र पैशांसाठी काही भामट्यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केलाय. त्यामुळे बाजारातून औषधं खरेदी करताना सावध राहा, तुमची सतर्कताच या गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पुरेशी आहे.