अमोल कोल्हेंपूर्वी राष्ट्रवादीत का आणि कुणावर आली होती आत्मक्लेशाची वेळ?
अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे आत्मक्लेश करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दुसरे नेते आहेत. याआधी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यावरही आत्मक्लेश करण्याची वेळ ओढावली होती.
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी (29 जानेवारी) आत्मक्लेश केला. व्हाय आय किल्ड गांधी (why i killed gandhi) या सिनेमात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने कोल्हे यांनी पुण्यात इंद्रायणी काठी गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आत्मक्लेश केला. राष्ट्रपित्या विषयी हा संशय होऊ नये म्हणून आत्मक्लेश करत असल्याचं कोल्हे यांनी नमूद केलं. (before actor amol kolhe deputy chief minister ajit pawar feeled repent due to had made statement in 2013 about drought victims)
कोल्हे हे आत्मक्लेश करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे नेते आहेत. याआधी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यावरही आत्मक्लेश करण्याची वेळ ओढावली होती. तो नेता कोण आहे, कोणत्या प्रकरणी आणि कधी आत्मक्लेश केला होता, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
विद्यमान आणि त्तकालिन आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर एप्रिल 2013 आत्मक्लेश करण्याची वेळ आढोवली होती. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी म्हणजेच प्रितीसंगम इथं उपोषण करत आत्मक्लेश केला होता.
नक्की कशामुळे ओढावली आत्मक्लेश करण्याची वेळ?
इंदापूरजवळ एका जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या पाणी प्रश्नावर खालच्या भाषेत विधान केलं होतं. यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.
शरद पवारांनीही अजित पवारांचे कान उपटले होते. यानंतर उपरती झाल्याने अखेर अजित पवार यांनी आत्मक्लेश केला होता. त्यामुळे आता आपल्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ ओढावू नये याची काळजी प्रत्येक नेत्याने प्रतिक्रिया देण्यापूर्वी करायला हवा.