मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रथमच ११ हजाराचा टप्पा ओलांडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात आलेल्या खरेदीच्या लाटेचा परिणाम म्हणून आज निफ्टीनं हा ऐतिहासिक स्तर ओलांडालाय.


येत्या अर्थसंकल्पाता कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपातीची शक्यता बघता ही खरेदी बघायला मिळतेय.


गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची वाढ झालीय... तर निफ्टीला १० हजारावरून ११ हजाराची पातळी गाठायला ७५ सत्र लागलीय.


निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांमध्ये जवळपास १० टक्क्कांची वाढ झालीय.