मुंबई : शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस पडला. या पावसाचा मुंबई लोकलवर परिणाम दिसला. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना १५ ते २० मिनिटे लेटमार्क बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उपनगरीय रेल्वे सेवा गुरुवारी सकाळी मान्सून पूर्व सरींसोबत विस्कळीत झाली. आधी मध्य रेल्वे आणि त्यानंतर पश्चिम रेल्वे अशा दोन्ही मार्गांची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. दरम्यान, दोन्ही मार्गावरील वाहतूक १५-२० मिनिटे उशिराने सुरु आहे.


मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने अप आणि डाऊन अशा दोन्ही बाजूच्या वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. तर पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकात ९ वाजण्याच्या सुमारास तात्रिंक बिघाड झाला. यामुळे मुंबईकडे येणारी आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या अशा दोन्ही बाजूच्या गाड्यांच्या परिणाम झाला.