BEST : मुंबईत बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट (BEST) उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बसेस (Buses on Lease) प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. पण गेल्या महिनाभरात बेस्ट बसला आग लागण्याची तीन घटना घडल्यात. या तिन्ही बसेस मातेश्वरी कंपनीच्या आहेत. बुधवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अंधेरी आगरकर चौक इथं बस क्रमांक 415 या बेस्ट बसने पेट घेतला. या घटनेत संपूर्ण बस आगीत स्वाहा झाली.  सुदैवाने सर्व प्रवासी वेळेत बस मधून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे मातेश्वरी कंपनीच्या एकूण 412 बसेसची सेवा उद्या म्हणजे गुरुवारपासून बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. पण यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर हाल सहन करावे लागणार आहे. 


बसने अचानक घेतला पेट
अंधेरी पूर्व आगरकर चौक इथं बस नंबर 7786 ही बस आगरकर चौक ते सिप्झ दरम्यान धावते. बुधवारी संध्याकाळी सिप्झ इथून बस नंबर 415  बस प्रवाशांना घेऊन आगरकर चौक इथं आली. बस मधून प्रवासी उतरले. त्याचवेळी अचानक इंजिन मध्ये धुर येऊन बसने पेट घेतला. ही बस विना वातानुकूलित असून सीएनजीवर धावणारी आहे. त्याआधी सांताक्रुझ इथं मातेश्वरी कंपनीच्या बसला आग लागली होती. तर 25 जानेवारीला वांद्रे इथं एस. व्ही जंक्शनवर 51 नंबरच्या बसने पेट घेतला होता. या बस मध्ये २५ प्रवासी होते.  बस वाहकाच्या सावधानतेमुळे 25 प्रवासी थोडक्यात बचावले होते.


बसला आग लागण्याची तिसरी घटना
मातेश्वरी कंपनीच्या 412 बसेस धारावी, मजास डेपो, सांताक्रुझ आणि प्रतीक्षा नगर डेपोतून मातेश्वरी कंपनी बस सेवा देत होती. मात्र महिनाभरात मातेश्वरी कंपनीच्या बसला आग लागण्याची ही तिसरी घटना असल्याने बेस्ट उपक्रमाने मातेश्वरी कंपनीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा घटना घडू नये अशी हमी कंपनीने दिल्यानंतर पुन्हा सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. 


या मार्गावर परिणाम
मातेश्वरी कंपनीच्या बसेस प्रतीक्षा नगर, मजास डेपो सांताक्रुझ आणि धारावी बंद डेपोतून मातेश्वरी कंपनीची बस सेवा सुरु होती. त्यामुळे उद्यापासून 36 बस मार्गावर परिणाम होणार असून प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत.