मुंबई: आज (बुधवार, ४ एप्रिल)  मध्यरात्रीपासून मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार आहे. भाडेवाढीला MMRTA ने मंजुरी दिल्यामुळे आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होईल. १ ते १२ रूपयापर्यंत ही बसभाडे वाढ असणार आहे. त्यामुळे २८ लाख बेस्ट प्रवाशांना या बस भाडेवाढीचा फटका बसणार आहे.
ही भाडेवाढ नक्की कशी असेल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

*पहिल्या चार किमी पर्यंतच्या भाडे किंमतीत कोणताही बदल नाही.
*चार किमी नंतर १ रु ते १२ रु. भाडे वाढ असेल
*६ किमी साठी सध्या भाडे-- १४ रु , प्रस्तावित भाडे-- १५ रु
*८ किमी साठी सध्या भाडे-- १६ रु, प्रस्तावित भाडे-- १८ रु.
*१० किमी साठी सध्या भाडे--१६ रु, प्रस्तावित भाडे--२२ रु...
*बस पासच्या किंमतीतही पहिल्या चार किमीसाठी कोणतेही बदल नाही...त्यापुढे ४० रु. ते ३५० रु भाडेवाढ असेल
*शालेय विद्यार्थ्यांच्या पास किंमतीत चार किमी पर्यंत बदल नाहीत, त्यापुढे ५० ते १०० रु वाढ असेल