मुंबई : मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप सुरु झालाय. बेस्टच्या ढसाळलेल्या आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांना दरमहा पगार वेळेवर देणंही बेस्टला शक्य होत नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासन आणि पालिकेतले सत्ताधारी या दोघांकडेही ठोस तोडगा नाही असा कर्मचारी संघटनांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी संघटनांनी कर्मचा-यांचं मतदान घेऊन संप करायचा की नाही याचा निवडा केला. त्यात कर्मचाऱ्यांनी संपाच्य़ा बाजूनं कौल दिल्यावर प्रशासनानं संप टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्य़ा.


काल दिवसभर महापौर विश्वनाथ महाडेश्वरांपासून तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या तीन बैठकही अयशस्वी ठरल्या.. त्यामुळे मध्यरात्रीपासून बेस्टची एकही बस रस्त्यावर धावताना दिसत नाहीये...


या संपामुळे रक्षाबंधन सणासाठी बाहेर पडणारे नागरिक, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणा-या नागरिकांचे हाल होणार आहेत.