मुंबई : बेस्ट कर्मचा-यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओत बेस्ट अधिकारी अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे. नोटा उधळतानाची व्हिडिओ क्लीप समोर आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकप्रिय कलाकारांना असे करणं शोभतं का? असा सवाल आता विचारला जात आहे.


बेस्टच्या वडाळा आगारातील हा संतापजनक व्हिडिओ असून या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री माधवी जुवेकर बेस्टमध्ये कामाला आहे. बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला, याचा धक्कादायक व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय. बेस्टचे अधिकारी खुलेआम नोटांची उधळपट्टी करत असल्याचं त्यात दिसतंय. बेस्टच्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागातली ही घटना आहे. बेस्टमध्ये कामाला असलेली अभिनेत्री माधवी जुवेकर हिडीस डान्स करतेय आणि बेस्टचे अधिकारी तिच्यावर दौलतजादा उधळतायत, हे या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय.


एकीकडे बेस्टचं चाक आर्थिक तोट्यात अडकलं असताना आणि कर्मचा-यांना महिन्याचा पगार वेळेवर मिळत नसताना नोटांची अशी उधळपट्टी संतापजनक आहे. या प्रकाराचा सविस्तर अहवाल बेस्टच्या दक्षता पथकानं बेस्ट प्रशासनाला पाठवून दिलाय. मात्र राजकीय दबावामुळं या प्रकरणावर पांघरूण घातले जात असल्याचं सांगितलं जातंय. बेस्ट डेपोचा डान्स बार करणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.


एकीकडे अनेक दिवसांपासून बेस्ट कर्मचा-यांच्या पगाराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कर्मचा-यांरी आंदोलनाच्या पावित्र्यात होते. अशात कर्मचा-यांनी एका अभिनेत्री अशाप्रकारे पैशांची उधळण करणे धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया येत आहे.