मुंबई : मंगळवारपासून सुरू असलेल्या 'बेस्ट' कामगांरांच्या संपाच्या निमित्तानं शिवसेना तोंडावर आपटलेली दिसतेय. 'बेस्ट' संपात दरम्यान शिवसेनाप्रणित कामगार सेनेत बेबनाव असल्याचं ढळढळीतपणे समोर आलंय. आज सकाळी मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर, वांद्रे आगारात सदस्यांनी सामूहिक राजीनामे सादर केलेत. शिवसेनाप्रणित 'बेस्ट कामगार सेना' या कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं कामगारांना विश्वासात न घेताच संपातून माघार घेतल्याचं जाहीर केलं होतं... 'बेस्ट'च्या ५०० हून अधिक बेस्टच्या बस रस्त्यावर धावतील अशी घोषणा काल शिवसेनेनं केली होती. तसंच कामगार सेनेचे ११ हजार कर्मचारी कामावर रुजू होतील, असंही शिवसेनेनं म्हटलं होतं. परंतु, आज सकाळी अवघे ६० कामगारही आज कामावर हजर झाले नाहीत... आणि अर्थातच शिवसेनेला तोंडावर पडावं लागलं. 


अधिक वाचा :- 'बेस्ट'च्या संपाचा दुसरा दिवस, सेनेची घोषणा फोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच आता शिवसेनेला दुसरा धक्का बसलाय. कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिल्यानं त्यामुळे शिवसेनेच्या संघटनेत असलेला बेबनाव समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या निर्णयामुळे शिवसेना तोंडावर आपटण्याची चिन्हे आहेत. 'बेस्ट कामगार सेने'नं संपातून माघार घेतल्यामुळे नाराज झालेल्या विविध डेपोतील बेस्ट कामगारांनी बेस्ट कामगार सेनेतून सदस्य पदाचा राजीनामे दिलेत. मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत आमच्या हक्काच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतलीय. 


अधिक वाचा : चर्चा निष्फळ, 'बेस्ट' कामगारांचा संप कायम