Bhau Beej 2020 : भाऊबीजेसाठी शुभ मुहूर्त
या मुहूर्ताला ओवाळा भावाला
मुंबई : दिवाळीच्या दिवसातील बहिण भावाचा सण म्हणजे 'भाऊबीज'. या दिवशी बहिण आज भावाला टिळक लावून त्यांच औक्षण केलं जातं. बहिण भावाच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. बहिण भावाला शुभ मुहूर्ताला ओवाळते.
भाऊबीजेचा मुहूर्त
सोमवारी भाऊबीजेचा मुहूर्त १२ वाजून ५६ मिनिटांपासून ते ३ वाजून ०६ मिनिटांपर्यंत आहे. यावेळी भाऊबीजेचा शुभ मूहूर्त २ तास ९ मिनिटे आहे. या मुहूर्तावर भाऊबीज करता आली नाही तरी ११ वाजून ४४ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटांचा शुभ मुहूर्त देखील यावेळी तुम्ही भाऊबीज करू शकता.
भाऊबीजेची कथा
सूर्यदेव आणि छाया यांच्या मुलांवर म्हणजे यमराज आणि यमुना यांच्यावर आधारित ही कथा आहे. यमुना कायमच आपल्या भावाला यमराजला घरी येऊन जेवणाचा आग्रह करत असे. मात्र, यमराज व्यस्त असल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हते. आणि ते यमुनाची गोष्ट टाळत असतं.
मात्र एक दिवस कार्तिक मासातील शुक्ल द्वितीयेला भाऊ यमराजच्या आपल्या दाराशी पाहून यमुना थक्क होते. प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करते आणि भोजन करते. यावेळी यमराज प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान मागण्याची विनंती करतात. यावेळी यमुना वर मागते की, आपण दरवर्षी माझ्याकडे स्नेहभोजनाला यावे. आणि या दिवशी बहीण भावाला औक्षण करेल त्याला कोणतेच भय नसेल.