मुंबई : साकीनाका इथे भानू फरसाण मार्टला लागलेल्या आगीचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे.


शॉर्ट सर्कीटमुळेच आग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुकानात आग शॉर्ट सर्कीटमुळेच लागल्याचं चौकशी अहवालात म्हटलं आहे. या प्रकरणी एल वॉर्डाचे वरिष्ठ स्वच्छता निरिक्षक जगदीश सावंत यांना निलंबीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर एल वॉर्डमधील इमारत व कारखाने विभागातील प्रविण वसावे, राहुल मारेकर, अमोल पाटील आणि विश्वनाथ पवार या ४ जणांसह इतर संबधितांची खात्यांतर्गत चौकशी करण्याची चौकशी अहवालात शिफारस करण्यात आली आहे. उपायुक्त राम धस यांनी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे हा चौकशी अहवाल सादर केला आहे. 


१२ जणांना होरपळून मृत्यू


दुकानाला लागलेल्या आगीत जवळपास १२ जणांना होरपळून मृत्यू झाला. पहाटे साडे चारच्या दरम्यान ही आग लागली होती. अग्निशमन दल या घटनास्थळी पोहोचले होते. पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. या दुकानात काम करणाऱ्या १२ कामगारांचा या आगीत मृत्यू झाला आहे.


विना परवाना व्यवसाय


त्याला मृत्यूप्रकरणी कारणीभूत ठरविण्यात आलेय. तसेच विना परवाना स्फोटके बाळगणे आणि महापालिकेच्या काद्यानुसार विना परवाना व्यवसाय करणे अशा गुन्ह्याखाली भानुशाली याला अटक करण्यात आली आहे.


कामगार अडकले


आग लागल्यानंतर दुकानावरचा स्लॅप या कामगारांवर कोसळला. दुकानातून बाहेर पडण्याची संधी देखील या कामगारांना मिळाली नाही. त्यामुळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बाहेर झोपलेले कामगार या मोठ्या दुर्घटनेतून वाचले होते.