चेंबूर आंदोलनानंतर हार्बर मार्ग आणि सायन-पनवेल मार्गावरील प्रवाशांचे हाल
चेंबूर येथील पडसाद थेट हार्बर लोकल वाहतुकीवर पडले असताना याचा फटका प्रवाशांना बसलाय आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र दिसून आले.
मुंबई : चेंबूर येथील पडसाद थेट हार्बर लोकल वाहतुकीवर पडले असताना याचा फटका प्रवाशांना बसलाय आहे. शहर बस गाड्याही कमी सोडण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तर सायन-पनवेल मार्गावर ग्रामीण भागातून आलेल्या एसटी गाड्या रोखून धरण्यात आल्यात. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र सायंकाळी ३.३० वाजेदरम्यान दिसून आले.
अनेक गाड्या रद्द
वाशीहून मुंबईकडे येणाऱ्या सर्व बस या चेंबूर, कुर्ला स्थानक दरम्यानच्या सर्व बस रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे अनेक प्रवाशांना चेंबूर फ्री वे पर्यंत आणण्यात येत आहेत. तर काही बस या भक्तीमार्ग येथील डेपोत थांबविण्यात येत आहेत. कोणताही धोका नको म्हणून पोलीस बस थांबवत आहेत. चेंबूर नाका येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
प्रवाशांची मोठी गैरसोय
दरम्यान, प्रवाशांनामध्ये सोडून देण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टॅक्सी, रिक्षा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. काहींनी पायी चेंबूरपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना एकही प्रवासासाठी वाहन मिळाले नाही.
रेल्वे प्रवाशांना मनस्थाप
भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर चेंबूर येथे आंदोलन करण्यात आल्यानंतर हार्बर मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. चेंबूर ते वाशी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दरम्यान, विशेष फेऱ्या म्हणून मानखुर्दपर्यंत पनवेल - वाशी - मानखुर्द अशी लोकल चालविण्यात येत आहे. मानखुर्दनंतर मुंबईकडे करणाऱ्यांचा प्रवास अत्यंत जिकरीचा झालाय. रिक्षा-टॅक्सी मिळत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.