मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातूनही भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.


मंडप कोसळल्याने काही जण जखमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकजण दादरमधील शिवाजी पार्कात थांबले आहेत. दरम्यान या ठिकाणी उभारण्यात आलेला मंडप अचानक कोसळला आणि त्याखाली काही भीमसैनिक अडकले. शिवाजी पार्कात मंडप कोसळल्याने जखमी झालेल्यांना सायन हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले आहे. यावेळी योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप करत भीमसैनिकांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांविरोधात घोषणाबाजी केली.


भीमबांधवांची गैरसोय


दरम्यान, भीमसैनिकांनी मैदानाऐवजी महापालिकेच्या शाळांमध्ये थांबावं असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या भीमबांधवांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे.


पाहा व्हिडिओ