मुंबई : Bhonga vs Hanuman Chalisa: कुर्ल्यात भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यावरून कुर्ल्यात जबरदस्त राडा झाला. (rada in Kurla) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवाजी पार्कमधील भाषणानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. घाटकोपरनंतर आता कुर्ल्यात राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी राडा घालणाऱ्या मनेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कुर्ल्यात कालीमाता मंदिरात भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यात येणार होती. मात्र तिथे पोलीस आले आणि त्यांनी भोंगे लावण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव केला. त्यामुळे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी जय श्रीरामचे नारे देत पोलिसांशी जोरदार हुज्जत घातली. 


भोंग्याबाबत सर्वांना समान न्याय द्या मशिदीवरचे भोंगेही काढा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. या भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. कार्यकर्ते ऐकत नाहीत हे पाहिल्यावर पोलिसांनी साऊंड सिस्टीम जप्त केली. मात्र पोलिसांनी साऊंड सिस्टीम जप्त केली तर आम्ही हनुमान चालिकाचं पठण करू, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.



कालीमाता मंदिरात कार्यकर्त्यांनी तोंडपाठ हनुमान चालिसाचं पठण केलं. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आपण पुन्हा असं करणार नाही अशी नोटीस कार्यकर्त्यांना देण्यात आली.