Eknath Shinde गटाला मोठा झटका, बंडखोर 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई
बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक होत आहेत. दुसरीकडे आता संघर्ष वाढताना दिसत आहे.
मुंबई : शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत आमदारांपर्यंत नोटीस पोहचवली जाणार आहे. (Action on 16 16 rebel Shivsena MLA)
व्हीप मोडल्याने शिवसेनेकडून कारवाई करण्याची तक्रार केली गेली होती. त्यानंतर आता शिंदे गटातील 16 आमदारांवर निलंबनाची नोटीस पाठवण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे आता या कारवाईच्या विरोधात काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत शिंदे गटात बैठक सुरु असल्याचं देखील कळतं आहे.
राज्यात शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयात शिवसैनिकांकडून तोडफोड होत आहे. आमदारांचे बॅनर फाडले जात आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहे.