मुंबई : Coronavirus कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता स्वप्ननगरी मुंबईतील प्रत्येक नागरिकाच्या चिंतेचा विषय ठरु लागला आहे. मुख्य म्हणजे फक्त मुंबईच्या दाटीवाटीच्या वस्त्या असणाऱ्या भागातच नव्हे तर आता रुग्णालय परिसरांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची बाब उघड झाली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईतील परळ येथे असणाऱ्या केईएम रुग्णालयातील एका ४७ वर्षीय डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लागण झालेले हे डॉक्टर रुग्णालयात वरिष्ठ एएमओ असून, ते वरळीमध्ये वास्तव्यास असल्याची बाब समोर येत आहे. मंगळवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले. ज्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मंगळवारी रात्री त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनासाठीच्या EMS ICU मध्ये हलवण्यात आलं. 


 


दरम्यान, ICU मध्ये काम करणारे स्टाफ तहे PPE वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे ३० हून अधिक स्टाफला क्वारंटाईन केलं जाऊ शकतं. ICU मध्ये त्यांच्यासोबत असलेल्या ६ रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज दिला असला तरी त्यांनाही लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाग्रस्त डॉक्टरांना रक्तदाब आणि किडनीचाही त्रास असल्याची बाब समोर येत आहे.