Kishori Pednekar : राज्याच्या राजकारणाती आताची सर्वात मोठी बातमी. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात वांद्रेतल्या निर्मल नगर पोलीस स्थानकात (Nirmal Nagar Police Station) फसणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गोमाता एसआरएप्रकरणी (SRA Scam) किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, याप्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्याकडून अद्याप कोणतीह प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
गेले वर्षभर आम्ही पाठपुरावा करत होतो, वरळीतल्या गोमसा एसआरएमध्ये गाळे ढापणे, स्वत:चं अनधिकृत कार्यालय उघडणं याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला अशी प्रतिक्रिया भाजपन नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे.


गोमाता नगरमधील घर आणि कार्यालय घेतलं होतं ताब्यात
गेल्या वर्षात 22 डिसेंबरला किशोरी पेडणेकर यांचं मुंबईतल्या गोमाता नगरमधील (Gomata Nagar) घर आणि कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) कारवाई करण्यात आली होती. गोमाता नगरमधील घर आणि कार्यालय मुंबई मनपाने ताब्यात घेतलं होतं. 


किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप
वरळी गोमाता नगरमधील एसआरए प्रकल्पातील 6 गाळे किशोरी पेडणेकर यांनी हडपल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. पेडणेकर यांनी घुसखोरी करुन घराचा ताबा घेतला, दोन वर्षांपूर्वी याची तक्रार केली होती, पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, तसंच त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.


किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं काय
भाजप नेते किरिट सोसय्या यांनी केलेल्या ट्विटला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं होतं. #भाडेतत्त्वावर राहत होते ,माझे कुठचेही गाळे नव्हते आणि कोणतेही गाळे सील झालेले नाही हे माहिती असून सुद्धा किरीट सोमय्या यांनी गरीब नागरिकांवर जोर दाखवून सत्तेचा वापर करून अन्याय केलेला आहे गोमातातील जनता हे ओळखून आहे. त्या गरीब नागरिकांची न्यायालयीन लढाई अजून बाकी आहे. असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं.