दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर एसबीआयची ग्राहकांना मोठी भेट
बँकेकडून करण्यात आलेले बदल तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत.
मुंबई : विजयादशमीचा मुहूर्त साधत स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक विशेष भेटवस्तू आणली आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करणं अधिक सोयीस्कर होणार आहे. कारण आता बँकेने ग्राहकांच्या डेबिट कार्डवर ईएमआईचे पर्याय आणले आहे. एसबीआयचे ३० कोटी डेबिट कार्ड युजर्स आहेत. ज्यामध्ये तब्बल ४५ लाख युजर्स या ऑफरचा फायदा घेवू शकतात. ६ स्टेपच्या माध्यामातून या पर्यायाचा फायदा ग्राहक फायदा घेवू शकतात.
बँक या विशेष ऑफर सोबतच ग्राहकांना ६ ते १८ महिन्यांपर्यंत ईएमआयचा पर्याय देत आहे. ते सुद्धा केणत्याही प्रकारच्या कागदपत्रा शिवाय. सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एसबीआयमध्ये १ ऑक्टोबर पासुन अनेक बदल झाले आहेत. या बदलाचा परिणाम तब्बल ३२ कोटी ग्राहकांवर होणार आहे.
बँकेकडून करण्यात आलेले बदल तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत. त्याचप्रमाणे आजपासून सेवा शुल्काव्यतिरिक्त एसबीआय कडून मासिक सरासरी शिल्लक (एमएबी) न राखल्याबद्दल दंड देखील बदलला जाणार आहे. याशिवाय बँकेने अधिक बदल केले आहेत.
ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी NEFT आणि RTGS व्यवहारदेखील स्वस्त होणार आहेत. जर तुमचं खातं मेट्रो सिटी आणि शहरी भागात असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात मासिक शिल्लक अनुक्रमे ५ हजार आणि ३ हजार रूपये ठेवावे लागत होते. परंतु आता १ ऑक्टोबरपासून दोन्ही संस्थांनी एएमबी ३ हजार रूपयांवर आणले आहे.