मुंबई : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. देशभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात वाढतच चालला आहे. अशावेळी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. मात्र गेल्या ५ दिवसांपासून मुंबईतील रूग्णसंख्येत घट होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ७० दिवसांत ९५३ जणांचा मुंबईत कोरोनानं मृत्यू झाला असून मृत्यूदर ०.०३ टक्के आहे. या काळात २.६६ लाख कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले. दिवसाला सरासरी १३ मृत्यू मुंबईत झालेत. तर दुसरीकडं दिल्लीत काल एका दिवसात २४० मृत्यू झालेत.


सध्या मुंबईत ३६८५ बेड शिल्लक असून यात ऑक्सीजनचे ६१४,व्हेंटिलेटर २५ आणि  आयसीयू बेड ३५ शिल्लक आहेत. आजच्या घडीला एकूण कोरोना रूग्णांपैकी ८७ रूग्ण हे लक्षणे नसलेली आहेत.  काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.


केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 


महाराष्ट्रात सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहाता. राज्यात प्रथम संचार बंदी लावण्यात आली. त्यानंतर सरकारने या नियमावलीत बदल करुन निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला. परंतु तरीही गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि आणखी काही उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र मंत्री मंडळाची आज बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत लॉकडाऊनवर गंभीर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सुत्रांच्या माहितीनुसार १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार मंत्रीमंडळ बैठकीत सरकार करत आहे. किमान १५ दिवस लॉकडाऊन लावावा अशी अनेक मंत्र्यांची आग्रही मागणी आहे आणि त्यानुसार सरकार आता १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करु शकतात.