Success Story: डॉक्टर ते IPS बनण्याचा थक्क करणारा प्रवास, सौंदर्यात अभिनेत्रीलाही टाकते मागे!

करिअरमध्ये अथक मेहनत घेऊन डॉक्टर बनल्यावर आयुष्यभर रुग्णसेवा करत चांगली कमाईदेखील करावी असे कोणालाही वाटू शकते. पण डॉक्टर बनल्यानंतरही काहींना त्यांची स्वप्न स्वस्थ बसू देत नाहीत.

| Jul 02, 2024, 08:41 AM IST

Success Story IPS Navjot Simi:करिअरमध्ये अथक मेहनत घेऊन डॉक्टर बनल्यावर आयुष्यभर रुग्णसेवा करत चांगली कमाईदेखील करावी असे कोणालाही वाटू शकते. पण डॉक्टर बनल्यानंतरही काहींना त्यांची स्वप्न स्वस्थ बसू देत नाहीत.

1/10

Success Story: डॉक्टर ते IPS बनण्याचा थक्क करणारा प्रवास, सौंदर्यात अभिनेत्रीलाही टाकते मागे!

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

Success Story IPS Navjot Simi:करिअरमध्ये अथक मेहनत घेऊन डॉक्टर बनल्यावर आयुष्यभर रुग्णसेवा करत चांगली कमाईदेखील करावी असे कोणालाही वाटू शकते. पण डॉक्टर बनल्यानंतरही काहींना त्यांची स्वप्न स्वस्थ बसू देत नाहीत.

2/10

परिश्रम, चिकाटी आणि उत्कटतेचे प्रतीक

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

IPS नवज्योत सिमी यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया. ज्या अथक परिश्रम, चिकाटी आणि उत्कटतेचे प्रतीक आहेत. त्यांचा डॉक्टर ते IPS अधिकारी बनण्याचा प्रवास थक्क करणारा आहे.

3/10

पंजाबमध्ये जन्म

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

21 डिसेंबर 1987 रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्या नवज्योत यांनी लुधियानाच्या बाबा जसवंत सिंग डेंटल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) ची डीग्री मिळवली.

4/10

दंतचिकित्सक म्हणून काम पण..

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

नवज्योत यांनी दंतचिकित्सक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. पण त्यांची स्वप्न आणखी मोठी आणि वेगळी होती. काही काळ काम केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

5/10

यूपीएससीत 735 रँक

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

नवज्योत यांनी दिल्लीतील एका संस्थेतून यूपीएससीचे कोचिंग घेतले. दिवसरात्र एक करुन अभ्यास केला. खूप परिश्रम घेतले.  पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा 735 रँकने उत्तीर्ण झाल्या. त्यांना आयपीएस सेवा आणि बिहार केडर देण्यात आले. 

6/10

बिहारमध्ये एसपी

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

सध्या नवज्योत सिमी बिहारमध्ये एसपी (वीकर सेक्शन अ‍ॅण्ड सेल) पदावर आहे. आपल्या कार्यकाळात त्या गुन्ह्यांची उकल करणे, महिला आणि मुलांची सुरक्षा आणि सामाजिक कल्याण साधण्यात यशस्वी ठरल्या आहेत. 

7/10

1.1 मिलियन फॉलोअर्स

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

नवज्योत या इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असतात. त्या आपल्या वैयक्तित आयुष्याशी संबंधित फोटो, पोस्ट शेअर करत असतात. त्यांचे इंस्टाग्रामवर 1.1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

8/10

कोणत्या गोष्टी महत्वाच्या?

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर त्यांनी समर्पण आणि प्रेरणा यांचे महत्त्व अधोरेखित केले.

9/10

व्हिजन आणि स्पष्ट कारण

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

नागरी सेवांमध्ये सामील होण्यासाठी तुमच्याकडे व्हिजन आणि स्पष्ट कारण असणे आवश्यक आहे, असे नवज्योत सांगतात.

10/10

IAS तुषार सिंगला यांच्याशी विवाह

Success Story IPS Navjot Simi Inspirational Marathi News

नवज्योत यांचे लग्न आयएएस अधिकारी तुषार सिंगला यांच्याशी झाले आहे. के पंजाबचे असून 2015 मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा 86 रँकसह उत्तीर्ण केली होती. तुषार सिंगला हे सध्या बिहार सरकारमध्ये वित्त विभागात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.