आताची मोठी बातमी! महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचाली
राज्यात Love Jihad प्रकरण वाढत असल्याने कायदा लागू करण्याचा विचार, येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न
सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) लव्ह जिहाद (Love Jihad) कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. लव्ह जिहादविरोधात कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरु असून येत्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात लव्ह जिहादची प्रकरण वाढत असल्याने लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) लव्ह जिहाद विरोधात कायदा आहे. लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला साह्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो असंही कायद्यात आहे. यातली पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल, तर तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे.
श्रद्धा वालकर हत्या लव्ह जिहाद प्रकरण?
सध्या देशात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा संबंध लव्ह जिहादशी जोडला जात असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे. श्रद्धा वालकर हिची हत्या लिव्ह इन रिलेशनमध्ये रहाणाऱ्या आफताब पुनावालाने केली होती.
नितेश राणे यांची आक्रमक भूमिका
महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू व्हावा यासाठी भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींना सक्षम कायद्याची फार गरज आहे. आज प्रत्येक जिल्ह्यात विविध घ टना घडत आहेत. हिंदू मुलींना फसवलं जातं. त्यांना विकण्यापर्यंतची मजल जाते. त्यामुळे महाराष्ट्राता धर्मांतर विरोधी कायदा लागू होणं ही काळाजी गरज आहे असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
हिंवाळी अधिवेशनात कायदा?
येत्या हिंवाळ अधिवेशनात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हे विधेयक अधिवेशनात मांडलं गेल्यास अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी याबाबत काही भूमिका घेतं येत्या काळात स्पष्ट होईल.