मुंबई : राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असताना आता मोठी अपडेट समोर येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपच्या संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मिनी विधानसभा निवडणुका म्हणजेच मोठ्या शहरांच्या महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर आहे. त्यापार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. 


राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खास निमंत्रण दिले होते. त्यानुसार फडणवीस यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
महाविकासआघाडी आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिस टोकाला जात असताना भाजप आणि मनसे जवळ येतात का या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.


मुंबई मनपा निवडणूकीत भाजपा मनसे युती होणार का याची राजकीय चर्चा वर्तुळात असताना भेट महत्वाची मानली जात आहे. 



-


big news, MNS Chif raj thackeray, raj thackeray meet, opposition party devendra fadnavis, mumbai, shivtirtha, BJP, MNS, BJP news, Marathi news, Marathi updates, MNS Chif raj thackeray updates, MNS Chif raj thackeray news, MNS Chif raj thackeray latest updates, MNS Chif raj thackeray speech, MNS Chif raj thackeray mumbai, BJP vs MNS, mahavikas aghadi,