बोलतो मराठी, ऐकतो मराठी! मनसेच्या मागणीला पुन्हा एकदा यश, आता खो-खोचंही मराठीत समालोचन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) मागणीला अखेर यश आलं आहे.
मुंबई : मराठीप्रेमींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) मागणीला अखेर यश आलं आहे. आयपीएल स्पर्धेनंतर (IPL) आता खोखो (Kho Kho Commentary In Marathi) या मराठी मातीतील खेळाचं समालोचन हे मराठीत होणार आहे. मनसेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता खोखोचं मराठीत समालोचन होणार आहे. (big success to demand of maharashtra navnirman sena now ultimate kho kho match commentary in marathi)
मनसे चित्रपट सेनेचे सर्वेसर्वा अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वी खासगी क्रीडा वाहिनीच्या कार्यालयात भेट दिली होती. या भेटीदरम्यान खोखोचं मराठीत समालोचन व्हावं, अशी मागणी केली होती. ही मागणी अखेर खासगी वाहिनीकडून मान्य करण्यमात आली आहे.
मनसेकडून वारंवार आणि सातत्याने मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. मग तो विषय नोकरीचा, मराठी अस्मितेचा असो किंवा मराठीतून समालोचनाचा. मनसेकडून याआधी आयपीएल स्पर्धेचंही मराठीत समालोचन करण्यात यावं. अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर मराठी कॉमेंट्रीला सुरुवात करण्यात आली.
समालोचकांना रोजगार
दरम्यान आता मनसेची मागणी मंजूर झाल्याने खोखोचं मराठीत समालोचन करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच राज्यातील जनतेला आपल्या मातीतील खेळाचा थरार मातृभाषेतून अनुभवता येणार आहे.