Maharashtra Politics : राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Assembly Budget Session) सुरु झालंय. त्यात शिंदे सरकारला (Shinde Government) अडचणीत आणण्यासाठी मविआकडून (Mahavikas Aghadi) रणनीती आखली गेलीय. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात (CM Eknath Shinde) विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी केली जातेय. मात्र त्यापूर्वीच विधानपरिषदेत ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी शिंदे-भाजपनं सापळा रचलाय. प्रतोदपदासाठी विलास पोतनीस (Vilas Potnis) यांचं नाव ठाकरे गटाकडून (Thackeray Group) देण्यात आलं.. त्यापूर्वीच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतोदाची नियुक्ती केली. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया (Viplav Bajoria) यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचं पत्रच शिंदेंनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना (Neelam Gorhe) दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदेंकडून ठाकरेंची कोंडी 
शिवसेना पक्ष आणि चिन्हं (Shivsena Symbol) शिंदेंना मिळालंय, स्वत: एकनाथ शिंदे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत. त्या नात्यानेच विधानपरिषदेत प्रतोदाची नियुक्ती शिंदेंनी केली. शिंदे गटाचा प्रतोद नेमल्यास खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकनाथ शिंदे यांचा 'आदेश' मानावा लागणार आहे. प्रतोद नेमल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे गटातील विधान परिषदेतील आमदारांना या नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार आहे. अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम असणार असल्याचं सांगण्यात येतंय


भाजपनेही खेळली चाल
विधानपरिषदेतली शिंदेंची खेळी ही फक्त प्रतोद नेमणुकीपर्यंत मर्यादित नाही. शिंदेंच्या खेळीसोबत भाजपनंही चाल खेळलीय.. आणि ही चाल आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंविरोधात. अंबादास दानवे (Ambadas Danve) शिवसेनेत (Shivsena) म्हणजे सत्ताधारी पक्षात असतील तर मग ते विरोधी पक्षनेते कसे  ते शिवसेनेत नाहीत का असा हल्ला भाजपनं चढवलाय. 



शिंदे गटाने काढलेल्या व्हीपपासून ठाकरे गटाला अवघ्या दोन आठवड्याचं संरक्षण सुप्रीम कोर्टानं देऊ केलं. या संरक्षणामुळे ठाकरे गटानं.. थोडाफार का होईना.. सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र त्यात शिंदे गटानं प्रतोदपदावरुन तर भाजपनं विरोधी पक्षनेतेपदावरुनच ठाकरे गटाला कोंडीत पकडलंय. शिंदे-भाजपचा हा दुहेरी हल्ला ठाकरे कसा परतवतात हे पाहणं महत्त्वांच ठरणार आहे.