मुंबई : लग्नाचा सिझन सुरू झाला की अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. लग्नात नवरदेवाला किंवा नवरीला मित्र परिवाराकडून मिळणारे गिफ्ट्स हे कायमच पाहण्यासारखे असतात. तसाच हा व्हिडिओ आहे.


काय आहे या व्हिडिओत



एका बाईक रायडर नवरदेवाला त्याच्या रायडर्स मित्रांकडून एकदम हटके स्टाईलने शुभेच्छा मिळाल्या आहेत. बाईक रायडर करता लागणारे सर्व किट महत्वाचे म्हणजे हेलमेट, जॅकेट, नी पॅड, सारख्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी घालून हे मित्र नव दाम्पत्याला भेटण्यासाठी स्टेजवर गेले. 


रायडर्स मित्रांना या अवतारात बघून पहिल्यांदा नवरदेव आणि नवरी दोघेही गोंधळले. पण त्या नवरदेवाने आपल्या मित्रांसोबतचा हा क्षण एन्जॉय केला. त्याने देखील त्या मित्रांसोबत मनमुराद डान्स केला. या रायडर्स मित्रांनी नवरीला देखील सोबत घेऊन हा डान्स केला. 


या आधी देखील असे अनेक व्हिडिओ शेअर झाले आहेत. जसे की, लग्नाला भाज्या घेऊन मित्र परिवार उपस्थिती राहिला. किंवा नवरदेव चक्क एटीएम घे्ऊन स्टेजवर उभा दिसतो. यासारखे अनेक व्हिडिओ आपल्याला व्हायरल होताना दिसतात.