कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली.
मुंबई : खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली.
खासगी शिकवण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणण्याबाबतचा तारांकित प्रश्न शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी विचारला होता.
खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणणारा कायदा तयार करण्याच्या दृष्टीने विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती तावडे यांनी यावेळी दिली.