नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून ६ ठिकाणी कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. महापे इथल्या २ आणि घणसोली इथल्या ४ पोल्ट्री मधल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निदान झालं आहे. या ठिकाणचे १० नमुने २५ जानेवारी रोजी चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, त्याचा रिपोर्ट आला असून, या कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणाहून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच ६ कावळे आणि २ कबुतरे यांच्या चाचणीचे निकाल येणे बाकी आहे.


कोरोनाचं संकट कायम असताना बर्ड फ्लूमुळे आता भीतीचं वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी याआधीच बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत आहे.  मुंबई, ठाणेनंतर आता नवी मुंबईतही बर्ड फ्लूचा संसर्ग झालाय.