बिश्नोई गँगच्या निशाण्यावर `बिग बॉस`, `भाईजान`च्या जीवाला धोका
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचे वडील ख्यातनाम पटकथा लेखक सलीम खान यांना बांद्रा बँडस्टँडच्या बेंचवर हे धमकीचं पत्र मिळालं होतं. सलमानच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून बिश्नोई गँगच्या तिघा शार्पशूटरना वाशीमधून अटक करण्यात आलीय. त्यानंतर आता सलमानला मुंबई पोलिसांच्या वतीनं वाय प्लस सुरक्षा देण्यात आलीय. (Bishnoi gang targets Bigg Boss Bhaijan lives in danger salman khan nz)
हे ही वाचा - राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?
सलमान खानला 'Y प्लस' सुरक्षा
सलमानच्या सुरक्षेसाठी आता 11 बंदूकधारी कमांडो तैनात असतील. 5 पोलीस कर्मचारी त्याच्या घराबाहेर 24 तास खडा पहारा देतील. 6 पीएसओ तीन शिफ्टमध्ये त्याचं संरक्षण करतील. त्याशिवाय CRPF कमांडोही सुरक्षेसाठी तैनात असतील.
हे ही वाचा - मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच
लॉरेन्स बिश्नोईने २०११ मध्ये ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानवर हल्ल्याची योजना आखली होती. परंतु तो अयशस्वी झाला. अलिकडेच पंजाबमध्ये सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याही हिटलिस्टवर सलमान असल्याचं समजतंय. त्यामुळं लाखो चाहत्यांचा जीव की प्राण असलेल्या भाईजानचा जीवच धोक्यात आलाय.