राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 

Updated: Nov 1, 2022, 11:20 PM IST
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार? title=
Sharad Pawar and Uddhav Thackeray to participate in Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Maharashtra nz

मुंबई : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 7 नोव्हेंबर ला नांदेड जिल्ह्यातील  देगलूर येथे दाखल होणार आहेत. देगलुर मध्ये छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होणार, देगलूर नगर परिषदेतर्फे सत्कार होणार यात्रेसाठी संपूर्ण तयारी तयारी झाली आहे. यात्रेला सर्व स्तरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. तर या यात्रेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर देखील सामील होणार आहेत. वकील, डॉक्टर, सामाजिक संघटना, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींचा यात्रेत सहभाग राहणार असल्याची माहिती येत आहे. (Sharad Pawar and Uddhav Thackeray to participate in Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Maharashtra nz)

हे ही वाचा - चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात

राहुल गांधी हे नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी मुक्काम करणार आहेत. रोज ज्या ठिकाणी मुक्काम आहे तिथे सभा आणि कॉर्नर मीटिंग होईल. 10 तारखेला नांदेडमध्ये सभा होईल. त्यानंतर नांदेड शहरातील देगलुर नाका येथून पदयात्रेला सुरुवात सुरू होईल, नंतर नवीन मोंढा मैदानावर सभा होईल. या यात्रेमुळे नाव इतिहास निर्माण होणार आहे, जगभरात या यात्रेची दखल घेतली जात आहे

हे ही वाचा - मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच

4 दिवस हिंगोली जिल्ह्यात यात्रा राहणार असून, मग हिंगोलीतून वाशिम आणि नंतर अकोला जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. रोज 24 ते 25 किलोमिटर पदयात्रा राहणार, महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेत सामील होणार. शिवाय समविचारी पक्षाचे कार्यकर्ते देखील सामील होणार आहेत. दररोज सकाळी 6 वाजता यात्रेला सुरुवात होणार, सायंकाळी 7 वाजेपर्यंत यात्रा संपणार.

हे ही वाचा - शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात - बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांच्या राज्यात 2 सभा होतील त्यात शरद पवार 8 तारखेला रात्री नांदेडला मुक्कामी येणार आहेत. 9 तारखेला ते यात्रेत सामील होणार आहेत. उद्धव ठाकरे हे देखील सामील होणार आहेत. यांनाही आमंत्रित केल्याच बाळासाहेब थोरात म्हणाले होते. 'जे सर्वसामान्य लोक पदयात्रेत सामील होणार त्यासाठी मी पण चालणार' हे घोषवाक्य देखील ठरलं आहे.