तिढा सुटणार का? भाजपच्या कोअर कमिटीची 11 वाजता बैठक
बैठकीत सत्तास्थापनेचा निर्णय होणार?
मुंबई : राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देण्यात आलं आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची आज 11 वाजता कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे.
'वर्षा'वर आजच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. आजच्या बैठकीत निमंत्रण स्वीकारण्याचा निर्णय अपेक्षित असल्याचं सुत्रांकडून म्हटलं जातं आहे. 11 नोव्हेंबर रोजी राज्यपालांकडून बोलावण्यात आलं आहे. यावेळी राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेसाठी किती दिवसांची मुदत देतात याकडे साऱ्यांचच लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.
सेना-भाजपमधील अजूनही डेडलॉक कायम आहे. चर्चेसंदर्भात दोन्ही पक्षांकडून कोणतीही हालचाल नसल्याची माहिती आहे. अजूनही दोन्ही पक्षांकडून तिढा सोडवण्यासाठी कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेबाबत अनिश्चितीचे सावट कायम आहे.
भाजपकडे सध्या १२३ आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा भाजप आमदार राम कदम यांनी केलाय. तर या तिढ्यावर तोडगा निघेल, आमच्यामध्ये काही लोक भांडणं लावतायत. असे लोक शिवसेनेनं ओळखावेत, असा सल्ल मुनगंटीवारांनी दिलाय.
राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं असताना शिवसेनेच्या गोटातही हालचाली वाढल्यात. मुंबईतल्या मढच्या हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांची शनिवारी संध्याकाळी शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतली. मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई, गजानन किर्तीकर आणि रामदास कदमांनी शिवसेना आमदारांशी चर्चा केलीय. भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलेलं असताना आता भाजपा काय करते याकडं शिवसेनेनं बारिक लक्ष आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या आमदारांना एकसंघ ठेवण्य़ासाठी नेते आमदारांशी वैयक्तिकरित्याही संवाद साधून आहेत.